लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा थेट खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप

 

अमरावती : अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या तरूणीचा शोध लागला आहे. बेपत्ता झालेली ही तरुणी अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. मात्र, या तरुणीच्या आरोपांनंतर आता प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे.

पहाटे साडेतीन वाजता तरूणीला अमरावती पोलीस साताऱ्यावरून अमरावतीला घेऊन आले. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवला. यावेळी तिने म्हटलं, की मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही या तरुणीने यावेळी केला.पहाटे तरुणीचा जबाब घेऊन घेऊन तिला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. यावेळी खासदार नवनीत राणा ह्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. मुस्लीम युवकाने तरुणीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आलेली. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात नवनीत राणा यांनी उडी घेतली होती. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांचं धर्मांतरण केलं जातं आणि त्यांच्यावर शारीरिक तसंच मानसिक अत्याचार केला जात असल्याचा आरोप राणा यांनी केला

Team Global News Marathi: