राजकीय परिस्थिती पाहून एकत्र लढायचं की वेगवेगळं ते ठरेल – नवाब मलिक

राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे येणाऱ्या मनपा निवडणुकीला ही आघाडी होणार की तिन्ही पक्ष वेगळे वेगळे लढणार अशी चर्चा होत होती.

आता राज्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीला महाविकास आघाडी होणार का यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.राजकीय परिस्थिती पाहून पुढे निवडणुका होणार आहे. एकत्र लढायचं की वेगवेगळं ते ठरेल. काही ठिकाणी भाजपच गिणतीतच नाही. त्यांना रान मोकळं कशाला करुन द्यायचं असे त्यांनी बोलून दाखविले होते.

पुढे रश्मी शुक्ला प्रकरणावर बोलताना मलिक म्हणाले की, रश्मी शुक्लाप्रकरणी संभ्रम निर्माण होताना फडणवीस यांच्या मनात भिती निर्माण झाली की नाही हे मला माहिती नाही. हा अहवाल निराधार होता. त्यामुळे खुलासा करणं आमची जबाबदारी होती. तपासातून सगळं बाहेर येईल, गुन्हा दाखल झाला आहे. ऑफिसर सिक्रेट अॅक्टचा प्रश्न आहे. सखोल चौकशी होईल. गंभीर विषय आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: