लोकांची इच्छा आहे की मी खासदार व्हावं – हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर | कोल्हापूर – सरकार बदलल्याने आपला विकास निधी थांबणार नाही खुद्द एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी दिला होता.गिव्ह आणि टेक पद्धतीने आपण निधी आणला आहे.आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं कधीच म्हटलं नसून लोकांची इच्छा आहे की मी खासदार व्हावं असं आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलय.

कागल तालुक्यातील मुरगूड येथील बांधकाम कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साहित्य शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वसामान्यांच्यासाठी कायदे, योजना आम्ही बनवण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे उगाचच नाटकीपणा करणाऱ्यांना या योजनांची काय माहिती असणार. सर्वसामान्य जनतेबरोबर सुख दुःखाच तीस वर्षाच नात आहे.

तसेच या जनतेला पुरं माहिती आहे. त्यामुळे कोणी काही म्हणो गरीब माणसांचे आशीर्वाद माझ्या मागे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Team Global News Marathi: