नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

नांदेड : दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर चिंतेचा विषय बनत चालला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होतं आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधासह 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते असुन सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला खरेदी व विक्री ची परवानगी देण्यात आली.कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केलं आहे.

नांदेड शहर व जिल्हा लॉकडाऊन निर्णयाबाबत रविवारी (ता.२१) अधिकाऱ्यांची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासन व मनपाच्या प्रमुख अधिकारी बैठकिला उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

 

राज्य शासनाने लॉकडाउनसंदर्भातील अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. जिल्ह्याची तसेच शहराची सध्याची परिस्थिती बघता २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून चार एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे. नांदेड शहर व9 जिल्ह्याची परिस्थिती पाहता लॉकडाउन हा एकच पर्याय असल्याचे मत बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. अचानक लॉकडाउन लावणे योग्य नसल्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी दोन दिवसाचा अवधी दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्णतः बंद

हॉटेल्स, उपहारगृह, बार तसेच सार्वजनिक कार्यक्रम.
मटन, चिकन, अंडी व मासे विक्री
सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी
सर्व प्रकारचे बांधकाम व कंन्स्ट्रक्शनची कामे
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, रिसॉर्ट, मॉल, आठवडी बाजार

सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम
सलुन व ब्युटी पार्लरची दुकाने
मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये फिरणे.
सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक
शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग पूर्णतः बंद
यांना आहे सवलत

किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील
दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल
भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते १० या वेळेतच करता येईल.

खासगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा सुरु राहतील
पेट्रोल पंप व गॅस वितरण सेवा सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक असेल.
वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेतच वर्तमानपत्रांचे वितरण करता येईल.
पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील
अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल
औषध विक्रीचे दुकाने २४ तास सुरु राहतील

ग्लोबल न्युज नेटवर्क: