13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठी भेट दिली आहे.

केंद्र सरकारने एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी दिली आहे .भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी ग्रेच्युटी आणि पारिवारिक पेन्शन वृद्धीसहित अनेक कल्याणकारी निर्णय सोमवारी वित्त विभागाने घेतले आहेत. एलआयसी (एजंट )अधिनियम 2017 मध्ये सुधारणा ग्रॅच्युईटी मर्यादेत वाढ आणि कुटुंब पेन्शनचे समान दर याबाबत निर्णय घेतले आहेत.

केंद्र सरकारने एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने एलआयसी एजंटसाठी ग्रेच्युटीची मर्यादा तीन लाखाहून पाच लाखांपर्यंत करण्यास मंजुरी दिली आहे .याचा हेतू त्यांच्या काम आणि मिळणारे लाभ यात योग्य सुधारणा करणे हा आहे .नोकरीवर पुन्हा घेतलेल्या एजंट ना नूतनीकरण कमिशन अंतर्गत प्राप्त ठरण्याची तरतूद आहे .ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होणार आहे.

विमा कव्हर आणि पेन्शन मध्ये वाढ

सध्या एलआयसी एजंट ना जुन्या एजन्सीनुसार पूर्ण केलेल्या कामाची नवीन कमिशन दिले जात नाही एजंट ना फिक्स विमा कव्हर म्हणून तीन हजार ते दहा हजार रुपयांवरून वाढवून 25 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये केले आहे. फिक्स विमा कवर मुळे मृत्यू पावलेल्या विमा एजंट च्या कुटुंबीयांना लाभ होईल तसेच एजंटच्या कुटुंबीयांसाठी 30% ची एक समान दरावर कौटुंबिक पेन्शनला मंजुरी दिली आहे.

कर्मचाऱ्यांना फायदा होणार

सरकारने म्हटले आहे की ,13 लाखाहून अधिक एजंट आणि एक लाखाहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना या कल्याणकारी योजनेचा फायदा होईल .ज्यामुळे एलआयसीचा विकास आणि वाढ होईल. साल १९५६ मध्ये पाच कोटीच्या भांडवलाने स्थापना केलेल्या एलआयसी जवळ 31 मार्च 2023 पर्यंत 40.81 कोटी रुपयांच्या इन्शुरन्ससह 45.50 लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची निर्मिती केली आहे.

Team Global: