खडसे आणि आघाडी सरकार मिळून भाजपचे वर्चस्व कमी करूया – पृथ्वीराज चव्हाण
भाजपाचे माजी जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यकन्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
चव्हाण म्हणतात की, खडसे आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपाचे राज्यातील वर्चस्व कमी करू, असे बोलून दाखविले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह
आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. खडसे यांनी फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून भाजपाला सोडचिट्टी देत असल्याचे बोलून दाखविले होते.