विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता

आज पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र आज पासून सुरु होणारे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज विरोधक अनेक मुद्द्यावर आघाडी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतरही विरोधक आक्रमक आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणावरुन हे अधिवेशन चांगलच गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मराठा आरक्षणप्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संयुक्त समितीकडे पाठवलेले एक विधेयक आहे (शक्ती फौजदारी कायदा सुधारणा) तसेच विधानसभेत एक प्रलंबित महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक आहे. तसेच चार प्रस्तावित विधेयके असून दोन प्रस्तावित अध्यादेश आणि एक अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली आहे.

गेल्या वर्षी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि आता परत महाविकास आघाडीचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे.या अधिवेशनात 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मांडणार आहेत. कोरोना अजून गेला नाही. तो परत वाढू लागला असून तो कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत.

Team Global News Marathi: