पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

 

मुंबई | यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगलेल्या असताना अखेर तो मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती.

महापुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि, ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भेटलेले नाहीत. त्यामुळे या भेटीत ते नेमके काय बोलणार आणि काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवसेनेने शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवले आहे तर काल दिल्ली येथील पत्रकार परिषदेत शिंदे यांनी या उठावाला गद्दारी नव्हे तर अन्यायाविरोधातील लढा म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतची भेट नक्कीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून आज मी १२ कोटी जनतेच्या वतीने विठ्ठलाची पूजा केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, असे साकडे विठूरायाला मी घातले आहेत. यावेळी पावसाळ्यात निवडणुका घेणं योग्य आणि सोयीचे होणार नाही. तसेच राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळेलच. आपल्या देशात लोकशाहीत बहुमताला महत्व आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टवर माझा पूर्ण विश्वास आहे.

 

Team Global News Marathi: