जीवन विमा घोटाळ्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सार्वजनिक जागृती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

 

मुंबई | भारतातील सर्वांत मोठ्या आर्थिक बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एकबजाज फिनसर्वने ‘सावधान रहें, सेफ रहे’ या जीवनविम्यातील घोटाळ्यांवर आधारित जनजागरूकता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात केली असून त्याद्वारे अशा घोटाळ्यांपासून कशा प्रकारे सुरक्षित राहावे याबाबत ग्राहक आणि जनतेला शिक्षित केले जाणार आहे. ही मोहीम कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालवली जाईल.

या जागरूकता उपक्रमाच्या माध्यमातून बजाज फिनसर्वचे उद्दिष्ट जीवन विमा पॉलिसीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्याचे आहे की, त्यांनी पॉलिसीची कागदपत्रे नीट तपासावीत आणि तपशिलांची पडताळणी विमा कंपनीच्या वेबसाइटवरूनच केली पाहिजे. कधी-कधी ग्राहक घोटाळेबाजांकून आलेल्या कमी अधिमूल्याच्या ऑफरकडे आकर्षित होतात आणि अवैध पॉलिसी कागदपत्रांना बळी पडू शकतात. ही मोहीम या गोष्टीवर अधोरेखित करते की, पॉलिसी धारकांनी पॉलिसीच्या वैधतेची पडताळणी करावी आणि खऱ्या व खोट्या पॉलिसीमधला फरक ओळखावा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉलिसी धारक घोटाळा झाल्यास अशा घटनांची तक्रार कुठे करू शकतात.

या मोहिमेत एक आकर्षक जिंगल आहे ‘ना जी ना जी’ आणि त्यात एक अत्यंत सुंदर व्यक्तिमत्त्व आहे- गुप्ताजी. ते आपल्या खास शैलीत हे जागरूकता संदेश पसरवत असतात. या मोहिमेत ग्राहकांना मोबाइल नंबर, ओटीपी, पत्त्याचा पुरावा, विमा पॉलिसी तपशील अशा प्रकारचे गोपनीय तपशील देण्याबाबत सावध राहण्यास मदत करणारे विविध संदेश आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जास्त बोनस किंवा इतर जास्तीच्या फायद्यांच्या ऑफरसोबत आपली सध्याची पॉलिसी जमा करू नये.

Team Global News Marathi: