‘आंख की अंधी और दिमाग से पैदल’ लालूंच्या मुलीने केली कंगनावर टीका !

 

सतत वादग्रस्त वक्तव्य करत नेहमीचर्चेत राहणारी अभिनतेरी कंगना राणावत हिचे काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. यावेळेस राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणीसोबत कंगनाच्या वादाला सुरुवात झाली आहे. रोहिणी यांनी सोशल मीडियावर राजकीय विषयांवर लेखन केले आहे. आत्ता मात्र त्यांनी आपला मोर्चा कंगना विरोधात उघडला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कंगनाविरोधात एक पोस्ट देखील लिहिली आहे.

कंगनाने सोशल मीडियावर लिहिले होती की, ‘गंगेमध्ये तरंगणारे मृतदेह भारताचे नाहीत. ते नायजेरियाचे आहेत.’ रोहिणीने कंगनाच्या या विधानाला उत्तर म्हणून पोस्ट शेर केली आहे. पोस्टमध्ये रोहिणी यांनी कंगनाला ‘आंख की अंधी और दिमाग से पैदल’ म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात रोहिणी आणि कंगना राणावत यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री राज्यसभेवर जाण्यासाठी सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत असल्याचे रोहीनीने म्हटले आहे. कंगना मानवतेचा गळा घोटत आहे. तिला तुरूंगात पाठवावे अशी मागणी देखील केली आहे. गंगेमध्ये तरंगत असलेल्या मृतदेहांना ती नायजेरियाचे सांगत आहे. असे करून कंगनाला ‘फकीरा’ ची प्रतिमा सेव्ह करायची आहे. ती बनावट झाशीची राणीही बनते आहे. असेही रोहिणी बोलली आहे.

Team Global News Marathi: