लखीमपूर दुर्घटनेवरून महाविकास आघाडी सरकारचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला

 

पुणे | मोदी सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाने लखमीपुर येथे शेतकरी आंदोलकांवर गाडी घालून ६ शेतकऱ्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या चौकात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष तसंच विविध पक्षांच्या वतीने वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जेंव्हा पासून मोदी-शहा सत्तेत आले आहेत तेंव्हापासून देशाची लोकशाही संपवण्याचे काम ते करत असल्याचा घणाघात प्रशांत जगताप यांनी केला.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले होते. लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीला चिरडले आहे. रविवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे एका दौऱ्यावर जात असताना आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली व सरकारचा निषेध करत काळे झेंडे दाखवले.

मात्र शेतकरी करत असलेल्या आंदोलनांचा राग मनात धरून मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक देशाचे अन्नदाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पातक केले आहे. असे प्रशांत जगताप यांनी आंदोलनातील शहिद शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.हे आंदोलन सत्तेसाठी किंवा पक्षासाठी नसून देशातील अन्नदात्यासाठी आहे असेही आंदोलकांकडून सांगण्यात आले होते.

Team Global News Marathi: