लाखोंचा जनसमुदाय येईल म्हणणाऱ्या सत्तारांच्या सभेला दिसून आल्या खाली खुर्च्या

 

शिंदे गटाचे बंडखोर नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना मर्यादा ओलांडत गलिच्छ भाषा वापरल्याने वाद निर्माण झाला. सत्तारांच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे भर सभेत सत्तारांचं भाषण सुरू असताना खुर्च्या उचलण्याची वेळ आली आहे.

सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या संभाजीनगरच्या सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा दावा सत्तारांनी केला होता. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने सत्तारांच्या दाव्यातली हवा निघाली आणि चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली.

खासदार शिंदे हे आपल्या मतदारसंघात भाषण करणार असून या सभेला लाखोंच्या संख्येने श्रोते उपस्थित असतील, असा दावा सत्तारांनी केला होता. पण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या सभेला श्रोत्यांनी पाठ फिरवली. सत्तारांच्या अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाल्याने भाषण सुरू असतानाच मांडलेल्या खुर्च्या उचलण्याची वेळ आली. विशेष म्हणजे या वेळी सत्तार हे मंचावरून ‘सभा संपेपर्यंत कुणी जाऊ नये’ असे आदेश श्रोत्यांना देत राहिले.

Team Global News Marathi: