कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला दिला शिवसेनेने जोरदार धक्का

 

सातारा | सातारा जिल्ह्यात कोरेगाव नगरपंचायतीच्या पुन्हा एकदा धक्कादायक निकाल लागला असून नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना १३ जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

कोरेगाव नागरपंचायतीचा लागलेला निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने सर्वाधिक म्हणजेच १२ जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनललने अवघ्या चार जागांवर विजय मिळवला आहे.

या कारणामुळं सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँक निवडणुकीत पराभव दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला होता. केवळ एका मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता.

Team Global News Marathi: