“कोणी मैदान देता का मैदान, शिल्लक सेनाप्रमुखांना आता फेसबुकवर…”; मनसेचा टोला

 

शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित केल्यास उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांपैकी कोणत्याही एका गटास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने दिल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही गटांचा अर्ज बुधवारी फेटाळल्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली.

त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी ठेवली आहे. यानंतर याता यावरून मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. “कोणी मैदान देता का मैदान …!” असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे.

तसेच “मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी, शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा” अशा शब्दांत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “कोणी मैदान देता का मैदान …! शिल्लक सेनेला शिवतीर्थावर “टोमणे मेळावा” घेण्यासाठी मैदान नाकारले… शिल्लक सेनाप्रमुख यांना आता फक्त फेसबुकवरच मेळावा घेण्याचा पर्याय उपलब्ध…” असं म्हणत बोचरी टीका केली आहे.

Team Global News Marathi: