कोल्हापूरकरांना उत्सुकता संजय पवार बाजी मारणार की महाडिकांना विजयी गुलाल लागणार?

 

कोल्हापूर | महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.

त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्राॅस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना सेफ झोनमध्ये ठेवण्यास प्राधान्य दिले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत.

शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, भाजप 106, बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी दोन, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आणि 13 अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 25 इतर मतांवर विसंबून आहेत.

 

Team Global News Marathi: