कोल्हापूर | १८ दिवसांपासून मुलगी बेपत्ता आमदार नितेश राणे करणार आंदोलन

 

मागच्या अठरा दिवसापासून कोल्हापुरातून एक मुलगी बेपत्ता असून याप्रकरणी या मुलीसोबत लवजिहाद सारखा प्रकार घडला आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. सदरची मुलगी ही अल्पवयीन आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या पालकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र 18 दिवस उलटूनही अद्याप कोणतेच कारवाई झालेले नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच याप्रकरणी आता आमदार नितेश राणे देखील मध्यस्थी करत असून उद्या नितेश राणे कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत.

कोल्हापुरात लवजिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना अठरा दिवसापूर्वी घडली असल्याचे समोर आले आहे.

त्याचप्रमाणे शिवाय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबत जाब विचारला आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे.

आम्हाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रत सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. तर या प्रकरणात आता आमदार नितेश राणे देखील मध्यस्थी करणार असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जावा यासाठी उद्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ते आंदोलन करणार आहेत.

Team Global News Marathi: