जाणून घ्या आजचे राशिभविष्य – कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

जाणून घ्या आजचे राशिभविष्य – कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 4 September 2022
वार – रविवार. 
04.09.2022
शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी, गौरी पूजन.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 21.43 पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक 21.43 पर्यंत नंतर धनु.
_________________________

आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 4 September 2022

मेष – ( शुभ रंग- पिस्ता)
आज फक्त आपलं कसं चाललंय एवढेच बघा, भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. वाहन काळजीपूर्वक चालवा.

वृषभ- ( शुभ रंग- लाल)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज पत्नीचा सल्ला अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचं भान ठेवा. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल थोडा संयम बाळगा.

मिथुन (शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. हीतशत्रू सक्रिय असल्याने नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करू नये. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)
तरुणांच्या मध्ये चैनी व विलासी वृत्ती बळावेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय आज तेजीत चालणार आहेत. उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. त्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)
स्थावर जमीन जुमल्याचे काही व्यवहार असतील तर आज उरकून टाका. आज मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेम प्रकरणात फसगत होऊ शकते सतर्क रहा.

कन्या- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. काम कमी व धावपळच जास्त होईल. रिकामटेकड्या चर्चेतून निष्पन्न काहीच होणार नाही. कृतीस प्राधान्य द्या.

तूळ -(शुभ रंग – मरून)
व्यावसायिकांची रखडलेली उधारी वसूल होईल. आज तुम्ही विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या कार्यक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकाल. आज केलेले प्रवास मात्र त्रासदायक होतील.

वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकतील. दूरचे प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.

धनु -(शुभ रंग – निळा)
खर्च आवाक्या बाहेर जाणार आहे. आज बचतीचा तर विचारच करू नका. बेरोजगारांना दूर गावी रोजगाराच्या संधी चालून येतील. घरात थोरा मोठ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल.

मकर- ( शुभ रंग- भगवा)
आज जसे चिंताल तसे होईल आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेली नाती एकत्र येतील.

कुंभ-( शुभ रंग- मोतिया) नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. कार्यक्षेत्रामध्ये ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत श्रम गरजेचे आहेत. कोणत्याही कामासाठी इतरांवर विसंबून राहू नका.

मीन (शुभ रंग- आकाशी)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने थोडा प्रतिकूल दिवस आहे. नोकरीत वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात जाऊ नका. कायदा मोडण्याचा विचार तर स्वप्नातही नको.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन 9689165424.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: