कीर्तनकार शिवलीला पाटीलने स्वतः मीडियाला पुढे येऊन सांगितलं बिगबॉसच्या घरात जाण्याचं कारण म्हणते –

कीर्तनकार शिवलीला पाटीलने स्वतः मीडियाला पुढे येऊन सांगितलं बिगबॉसच्या घरात जाण्याचं कारण म्हणते –

बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला पाटील हिने सहभाग दर्शवला होता. मात्र तिच्याविरोधात प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवलीला पाटीलला काही दिवसातच बिग बॉसच्या घरातून बाहेर निघणे भाग पडले होते. आजारी असल्याचे कारण सांगून तिने बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर शिवलीला पाटील पुन्हा एकदा कीर्तन करण्यास सक्रिय झालेली पाहायला मिळाली. मात्र सांप्रदाय समाजाकडून तिच्या कीर्तनकरण्याला जोरदार विरोध होऊ लागला. नुकतेच बुलढाणा जिल्ह्यात शिवलीला पाटील कीर्तन करण्यासाठी दाखल झाली होती मात्र तिथे गर्दी झाल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल केला गेला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शिवलीला पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवलीला पाटील कीर्तनासाठी दाखल झाली त्यावेळी तिचे कीर्तन ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती . मात्र दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडले होते. शिवाय याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

वारकरी संप्रदायमधील लोकांनी शिवलीला पाटीलने कीर्तन करू नये असाही जोर धरलेला पहायला मिळाला. यावर कीर्तनकार पाटील यांनी नुकतेच एक स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या-बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक आहे. वारकरी संप्रदाय मधील लोकांनी मला मोठं केलं मी त्यांची हात जोडून मस्तक ठेऊन क्षमा मागते. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती आपल्या संप्रदाय माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले होते. बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे त्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रेक्षकांना कीर्तन काय असते हे समजले अमराठी लोकांनाही कीर्तनाचा परिचय झाला.

बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे त्यांना माझ्यामुळे कीर्तनाची माहिती मिळाली असं मी मानते. तिथं राहून मी या लोकांना वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन सोडले नाही, मी वारकरी संस्कृती जपली शिवाय मी माझा पदर देखील सोडला नाही. तिथं राहून मी शेला घेतला होता हे तुमच्या लक्षात येईल. पण एक महिला कीर्तनकार आहे. म्हणून विरोध होत असल्याची टीका त्यांनी केली.

बिग बॉसच्या घरात जाऊन मी माणसं बदलली नाही तर त्यांचे विचार बदलावे या हेतूने मी तिथं गेले होते. हे एक चांगलंच काम मी केलं असं मी मानते. मी जे कीर्तनात बोलले तेच मी तिथे वागले…बिग बॉसच्या घरात मी नाचले म्हणून अनेकांनी टीका केल्या पण जिथे विठू रायचं गाणं वाजलं जिथे भवानी आईचं गाणं वाजलं तिथेच मी नाचले पण दुसऱ्या दिवशी जेव्हा हिंदी गाणी वाजू लागली तेव्हा मी हातही हलवला नाही मग ह्यात वाईट काय…

ग्लोबल न्युज नेटवर्क: