किरीट सोमय्यांचा कोकण दौरा, आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिल्या नोटीस

 

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दापोली दौऱ्यावर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झालेत.

मात्र तत्पूर्वी या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सोमय्या यांच्या दौऱ्यादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यातून वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोटीस बजावली आहे.

दरम्यान, अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही प्रसारमाध्यांना दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: