“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथे पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारनं जाहीर केलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामागे सरकारचा पळपुटे धोरण असून पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून फक्त दोन दिवसांचं अधिवेश करण्याचा निर्णय घेतला गेला, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. आशिष शेलार तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश सहप्रभारी मा. ओमप्रकाश धुर्वे आणि मा. जयभानसिंह पवैय्या ऑनलाईन सहभागी झाले होते.

पुढे ठाकरे सरकारला टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू असून कुणाला कशाचा थांगपत्ता नाही, असं सांगत मंत्री झालेत आपल्या विभागेच राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नसून ही सर्कस सुरू आहे, असा हल्लाबोल केला. कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारानं बरबटलेलं हे सरकार आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

 

Team Global News Marathi: