खासदार बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेची तक्रार!

 

बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तक्रार दाखल केली आहे. दादार मधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकील दादर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी रितसर तक्रा दिली आहे.

मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दाखल केली असून भाजपचे खासदार असलेले बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेल्या या वक्तव्यावरून तक्रार देण्यात आली आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आली आहे.

बृजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी तक्रार पाटील यांनी केली आहे. मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड गजणे , ॲड रवी पाष्टे , उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर सह कार्यकर्त्यांनी दादर पोलीस स्थानाकात जाऊन ही तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळे बृजभूषण आणि मनसेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: