खडसे कृषीमंत्री, आव्हाड प्रदेशाध्यक्ष, गृहनिर्माणमंत्रीपद सेनेकडे ?

मुंबई : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील मंत्रीमंडळात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे विधान परिषदेवर जाणार असून त्यांना मंत्रीपदही मिळणार आहेत. खडसे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते हे शिवसेनेकडे जाणार असल्याचे समजते त्याऐवजी विद्यमान गृहमंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षातर्फे दिली जाऊ शकते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येत्या काळात राज्याच्या सरकारमध्ये विशेषतः महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.

माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे माझ्या कुटूंबाला त्रास सहन करावा लागला, असे ते म्हणाले. माझ्या मागे कार्यकर्त्यांची फौज आहे. लोकांचे आशीर्वाद आहे, त्यांच्या भरवशावरच हा मी निर्णय घेतला आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपली तक्रार देवेंद्रजींविरोधात आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल करण्यात आला यामुळे मला वेदना झाल्या, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यातून माझी निर्दोष मुक्तता झाली आहे, मला पद न मिळाल्याचे दुःख नाही, जे काही पक्षाने दिले ते मी मेहनतीने मिळवले आहे, असेही खडसेंनी सांगितले.

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंदच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रक्षा खडसे भाजपतच राहणार

एकनाथ खडसे यांना खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार का याबद्दल हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे. मी भाजप सोडण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे, असेही ते म्हणाले. खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, अशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रीया दिली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मा. पाटील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: