‘केवळ राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणून मी जाणार याने तुमचे हिंदुत्व सिद्ध होत नाही’

 

नगर | मला आदित्य ठाकरेंची कीव वाटते. ते राजकारणात नवीन, त्यांना अजून बरंच काही शिकायचंय. त्यांनी चांगल्या लोकांकडून धडे घेतले पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सल्लावजा टोला लगावला आहे तसंच, ‘केवळ राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणून मी जाणार याने तुमचे हिंदुत्व सिद्ध होत नाही’ असा टोलाही विखेंनी लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सुद्धा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. मला आदित्य ठाकरेंची कीव वाटते. आदित्य ठाकरे राजकारणात नवीन, त्यांना अजून बरंच काही शिकायचंय. त्यांनी चांगल्या लोकांकडून धडे घेतले पाहिजे,केवळ राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणून मी जाणार याने तुमचे हिंदुत्व सिद्ध होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही ज्या तडजोडी केल्या. त्याबद्दल राज्यातील जनता शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

(‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती ठरली शुद्धी कदम !) हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरेंबद्दल देशभरात आदर आहे. मात्र त्यांनी सत्तेसाठी कधी विचारांची तडजोड केली नाही. मात्र आज शिवसेनेने तडजोड केली.त्यांचा प्रवक्ता जे बोलतोय ते बाळासाहेबांचे विचार संपवण्यासाठीच बोलतोय, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

Team Global News Marathi: