केतकी चितळेच्या अडचणीत वाढणार, न्यायालयाने १४ दिवसांची सुनावली कोठडी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाण्याच्या सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले आहेत.

तसेच गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कस्टडीची मागणी केली होती. न्यायालयाकडून कस्टडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीस कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीची वाट पाहात आहेत. तोवर केतकीला वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सध्या ठाण्यातील तुरुंगात नेण्यात आलं आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार आहेत.

केतकीची पोलीस कोठडी आज संपुष्टात आल्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं सर्व कागदपत्रं तपासली आणि तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेनं केतकीची कस्टडी मागितली आहे.

केतकीचा मोबाइल आणि लॅपटॉप सायबर शाखेकडे तपासणीसाठी देण्यात आला असून त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल त्यामुळे तिच्या कोठडीत आणखी वाढ करुन देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

Team Global News Marathi: