‘काय दारु…काय चकणा..समदं कसं ओके’; युवासेनेचा शहाजीबापूंना टोला

 

काय झाडी काय हॉटेल फेम शहाजी बापू शिंदे गटात सामील झाल्यापासून विरोधकांच्या रडारवर आहे अशातच शिवसेनेने आणि राष्ट्र्वादीने त्यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरवातकेली आहे अशातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेला आता अकलूजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अनेकदा टिका केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पदाधिकारी आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. आमदार शहाजीबापू पाटील आता राज्यभर प्रसिद्ध झाले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पाटील यांच्या टिकेमुळे दुखावलेले पंढरपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चांगलेच आक्रमक होत पुढे सरसावले आहेत.

युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी नुकतंच बोलताना म्हटलं होतं, की उद्धवसाहेब आणि आदित्य साहेबांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर जितकं लक्ष ठेवायचं तितकं ठेवा आणि मला पाडायचं असेल तर पाडा, असं चॅलेंज त्यांनी ठाकरेंना दिलं होतं. यावरुनच युवासेनेनं निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं.

युवासेनेच्या पोस्टमध्ये पाटील यांना टोमणा देत म्हटलं ‘बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु…काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके. बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल. आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःचं घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या’, अशी बोचरी टिका केली आहे.

Team Global News Marathi: