कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले – आदित्य ठाकरे

 

निवडणुका येतात आणि जातात, पण सध्या कश्मिरी पंडितांचा विषय महत्त्वाचा आहे. इतक्या वर्षांनंतरही तेथील चित्र बदललेले नाही. महाराष्ट्राचे दरवाजे कश्मिरी पंडितांसाठी नेहमीच खुले आहेत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले. ‘मुंबई हरित योद्धा’ या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.

कश्मिरी पंडितांच्या प्रश्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कश्मिरी पंडितांवर ‘काश्मीर फाईल’ चित्रपटाच्या प्रसिद्धीबाबत किंवा चित्रपटाच्या कमाईबाबत बोलणार नाही. आता जाब विचारण्याऐवजी काय ठोस पावले उचलता येतील, यावर ठोस कारवाई करावी लागेल असे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिउत्तर दिले होते.

नियोजित अयोध्या दौऱयाबाबत विचारले असता ते म्हणाले की, अयोध्या दौऱयात फक्त भगवान श्रीरामांचे दर्शन घेणार आहे. तेथील संघर्ष आता संपला आहे. किल्ले शिवनेरीवरून तिथे माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर योगायोगाने न्यायालयाच्या केसला चालना मिळाली. न्यायालयाच्या निकालामुळे राम मंदिर निर्माण होत आहे. आता श्रीरामांचे आशीर्वाद घ्यायला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Team Global News Marathi: