कसबा पोटनिवणुकीत भाजपकडून तिकीट कुणाला? फडणवीस पाटील बैठकीमध्ये या नावाचा विचार ?

 

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पश्चात उमेदवारी कुणाला मिळणार यावरून सस्पेन्स वाढला आहे.शुक्रवारी रात्री टिळक वाड्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर टिळक यांच्या कुटुंबाच्या तिकीटाबद्दल सस्पेन्स वाढला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील पुन्हा टिळक वाड्याच्या भेटीला पोहोचले होते.

कसब्याचं तिकिट टिळक वाड्यालाच मिळणार की फक्त प्रवक्तेपदावर समाधान मानावं लागणार अशी चर्चा रंगली आहे. कसब्याचा सस्पेंस अजूनही कायम आहे. तर, कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट फायनल व्हायच्या आधीच कुणाल टिळकची कालच प्रवक्तेपदावर नियुक्ती झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर आता शैलेश टिळक यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “फडणविस पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांना मेसेज पाठवून आज भेट होईल का, याबाबत विचारले होते. त्यांनीही नक्कीच म्हणत मीच घरी येतो असं सांगितले. व्यस्त वेळापत्रकातूनही ते येतील असं वाटत नव्हते, पण आले.” अशी प्रतिक्रिया टिळक यांनी दिली.तर, ‘मनशांती सगळ्यासाठी गरजेची. मी आता तोच अनुभव घेतला. निवडणुकीचे उमेदवार दिल्लीतून घोषित होतील तुम्हाला कळेलच. बिनविरोध निवडणुका होण्यासाठी नक्की प्रयत्न करू’ असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

चिंचवडमध्येही जगताप कुटुंबामध्ये वादाचा अंक दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर भाजपमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही, त्यातच जगताप कुटुंबामध्ये वादाचा अंक समोर आला आहे.लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारीवर दावा केला, त्यानंतर त्याच भाजपच्या अधिकृत उमेदवार असतील अशी चर्चा रंगली. त्याचवेळी दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीत शंकर जगताप यांचं नाव आलेलं नाही.

Team Global News Marathi: