बेघर निवारा केंद्र मधील कार्तिकीचा सत्यशोधक पद्धतीने अनोखा विवाह संपन्न

बेघर निवारा केंद्र मधील कार्तिकीचा सत्यशोधक पद्धतीने अनोखा विवाह संपन्न

सांगली – पंढरपूर येथे एका निर्जनस्थळी आठ महिन्यांची असताना मृत आईच्या सोबत कार्तिकी महिन्यात कार्तिकी सापडली. ती सापडली असताना मृत आईचे दोन दिवस दूध पीत होती. आई मृत झाल्याचे लोकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या बालिकेस ताब्यात घेऊन तिला रेणुका शिशुगृह मध्ये ठेवले. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला परंतु नातेवाईक आढळून आले नाही. पोलिसांनी पेपरला ही फोटोसह बातमी दिली होती.

नंतर रेणुका शिशू गृह मध्ये कार्तिकीला दाखल करण्यात आले. त्यानंतर वासुदेव बाबाजी नवरंगे या संस्थेत ट्रान्सफर केले. तिथे कार्तिकी तीन वर्षाची होईपर्यंत राहिली. तीन वर्षाचे असताना तिला भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मध्ये दाखल केले. 18 वर्षानंतर ती संस्थेतून स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडली. परंतु कोणी नातेवाईक, ना घर ना दार, इकडे तिकडे काही ओळखिच्या लोकांनडे राहत होती.

आईचा पत्ता, ना बापाचा पत्ता, जिथे आधार मिळेल तिथे ती राहत होती. नंतर एक सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई माहिमकर यांनी तिला आपल्या जिजाऊ महिला आधार केंद्राकडे घेऊन त्यानंतर ती आस्था बेघर महिला निवारा केंद्रांमध्ये दाखल झाली. बेघर महिला निवारा केंद्र सुरू झाल्यानंतर ती तिथेच राहायला लागली व केअर टेकरचे काम करत होती. गेली दीड वर्षे आपल्या आस्था बेघर महिला निवारा केंद्रांमध्ये राहात आहे.

अजय डवके हा नवरा मुलगा नवी मुंबई येथे केयर टेकरचे काम करत आहे. त्याला आई आणि एक बहिण आहे. वडील लहानपणी वारले. अशा खडतर प्रवासानंतर कार्तिकी 25 डिसेंबर रोजी अजय बरोबर विवाह बंधनात अडकली आणि तिचे कन्यादान महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी केलं.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: