कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले

ग्लोबल न्यूज: कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: