कागदी आणि प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, सुप्रीम कोर्टाचा आदेश

राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यांवर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने एका जनहीत याचिकेवर निर्णय देतांना प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत. त्यानुषंगाने नागरिक व विद्यार्थ्यांनी कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

शासनाच्या 1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानूसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सुर्यादयापूर्वी, जिल्हाधिकारी किंवा तहसिल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट्र करण्यात यावेत. तसे करतांना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरी विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Team Global News Marathi: