राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत – चंद्रकांत पाटील

 

काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यसखा चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र या पत्रामुळे नितीन गडकरी यांच्या साखर कारखान्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.

आता या टीकेचा चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत. ते त्यांच्या मनाला येईल ते बोलत असतात. आपण पत्रासोबत पाठवलेली यादी ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तयार केलेली आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत जसा गैरव्यवहार झाला तसा प्रकार नितीन गडकरी यांच्याबाबतीत झालेला नाही. त्यांनी याबाबत यापूर्वीच खुलासा केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आपण सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आणि लगेचच केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी मा. अमित शाह यांना दिली, असे एका पत्रकाराने निदर्शनाला आणले. मात्र केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन करण्याशी आपल्या पत्राचा काही संबंध नाही असे त्यांनी बोलून दाखविले होते. तसेच मोदी सरकारमध्ये असे निर्णय खूप आधीपासून बारकाईने विचार करून घेतले जातात. तथापि, केंद्राच्या नव्या सहकार मंत्रालयाचा राज्याला उपयोगच होणार आहे.

Team Global News Marathi: