जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळल्या, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

जोरदार वादळीवाऱ्यासह बुधवारी कोसळलेल्या पावसामुळे जेएनपीटीच्या तीन क्यूसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळल्या. त्यामुळे सुमारे 200 कोटींचे नुकसान झाले आहे. उरण शहर आणि ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. पत्रे उडाल्याने घरात पाणी शिरले आहे.

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी तर पावसाने अगदी कहरच केला. जोरदार वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जेएनपीटीच्या तीन क्यूसी क्रेन्स अगदी पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत.

यामुळे जेएनपीटीचे सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र यामुळे जेएनपीटीच्या व्यवसायाची नव्याने यंत्रणा उभारण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती कामगार वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

शहर आणि ग्रामीण भागातील गावांतही अनेक घरांची पडझड झाली आहे. पत्रे उडाल्याने घरात पाणी शिरले आहे. गावागावातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

साभार सामना ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: