जयंत पाटलांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारमध्ये फूट? राऊतांचे सूचक विधान

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यानंतरही अनेकदा वाद झालेले पाहायला मिळाले होते. खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर भाष्य करून काँग्रेसला अंगावर घेतले होते. त्यात आता संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात कुंटे यांच्या मुद्द्यावरून वाद झालेले पाहायला मिळत आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली.

बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गार विधानही त्यांनी काढले होते. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना खडेबोल सुनावले होते. याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

राऊत म्हणाले की, कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकासआघाडी मधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे ते म्हणाले की कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाहीअसा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: