जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न – एकनाथ शिंदे

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याची सध्य परिस्थिती आणि आगामी काळात वाटचाल करण्यासंदर्भात भाष्य केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितले आहे. तसेच, ‘राज्यातील जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत’, असे म्हटले.

‘सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी आम्ही बोलतो आहोत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्री महोदय यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. केंद्राच्या योजनांची आणि कार्यक्रमांची राज्यात सर्वात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे, असे निर्देश आम्ही प्रशासनाला दिले आहेत’, असे त्यांनी सांगितले.

‘पीक पद्धतीत बदल विविधीकरण, सिंचन व्यवस्था बळकट करणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे यातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करणार आहोत. यासंदर्भात नुकतीच नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राची भूमिका मी परखडपणे मांडली आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Team Global News Marathi: