जानेवारी पासून बदलणाऱ्या नियमांमुळे गूगल आणि ऑनलाईन पेमेंट धारकांना बसणार झटका

 

२०२२ हे वर्ष संपण्यास आता अवघे ८ दिवस उरले आहेत. यानंतर जानेवारीपासून नवीन नियम लागू केली जातील. नवीन नियमात अनेक टेक फ्रेंडली सर्विसचा समावेश होणार आहे. या सर्व बदलाची माहिती लोकांना व्हायला हवी. अन्यथा गुगल आणि ऑनलाइन पेमेंट यूजर्सला नुकसान सोसावे लागू शकते.

गुगलने घोषणा केली आहे की, विंडो ७ आणि ८.१ साठी जानेवारी २०२३ पासून नवीन क्रोम व्हर्जनचे सपोर्ट बंद केले जाणार आहे. याचा अर्थ विंडो ७ आणि ८.१ व्हर्जनसाठी अधिकृत सपोर्ट ७ फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार आहे. जुन्या लॅपटॉपमध्ये १ जानेवारी २०२३ नंतर गुगल क्रोमचा वापर करण्यात येणार नाही.

१ जानेवारी २०२३ पासून गुगल कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट जसे कार्ड डीटेलला सेव्ह करणार नाही. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर १ जानेवारी नंतर मॅन्यूअली ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड नंबर सोबत एक्सपायरी डेट सुद्धा लक्षात ठेवावी लागेल. हे सर्व आरबीआयच्या गाइडलाइन्स अंतर्गत केले जात आहे. ऑनलाइन पेमेंटला आधीच्या तुलनेत जास्त सुरक्षित बनवले जात आहे.

Team Global News Marathi: