जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्याविरोधात रक्षा खडसे मैदानात

 

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यात होत आहे.रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेणार आहेत.

अशातच आपल्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांची चांगलीच गोची झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहार प्रकरणात जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याच परिवाराच्या विरोधात ही टीका ऐकत असताना खासदार रक्षा खडसे यांची मात्र चांगलीच गोची होताना दिसून येत आहे. मात्र महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाला आपल्याच लोकांच्या विरोधात लढावे लागले होते, त्याच पद्धतीने राजकारणात आता खासदार रक्षा खडसे यांनाही आपल्या पक्षाशी आणि नेत्यांशी बांधिलकी दाखवत आपल्याच सासूच्याविरोधात प्रचारात उतरावे लागले आहे.

Team Global News Marathi: