दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे – बच्चू कडू

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे – बच्चू कडू

देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२-१४ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे.

यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करताना, शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता त्यांच्या या वक्त्यव्याचा मंत्री बच्चू कडून यांनी खरपूस समाचार घेतला.

दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवेंवर जोरदार टीका केली आहे. एवढेच नाहीतर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंच्या घरापर्यंत आम्ही याआधी गेलो होतो, आता घरात घुसून मारावे लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: