भाजपचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) सणसणीत टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं. मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला. आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत…. रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?” असं म्हणत शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता… आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे.
एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती,
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला
त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 13, 2021
तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुशार” सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा” अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत… रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?” असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे
तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतातआम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही,कारण जनतेचा जीव महत्वाचा!
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 13, 2021