आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का ? आत्महत्या करून खरंच प्रश्न सुटतात का ?

सुरज गायकवाड

आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का ? आत्महत्या करून खरंच प्रश्न सुटतात का ?

आत्महत्या हा शब्द जर तुम्ही फोड करून वाचला तर आत्म आणि हत्या असे दोन अर्थाच्या शब्दाची यातून निर्मिती होते. पण आजची पिढी का बरं आत्महत्या करत असेल. रोज आपल्या घरात येणाऱ्या वर्तमान पत्राच्या पहिल्या दुसऱ्या पानावर तुम्हाला अमुक-तमुक व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटनाछापून येते. तशी आत्महत्या करण्याची कारणे सुद्धा अनेक असतात. पण आत्महत्या करून खरंच प्रश्न सुटतात का ?

तसे पहिले तर आत्महत्या करण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात.परीक्षेत अपयश, असफल जीवन, कर्जबाजारी, आजारपण अशी अनेक कारणे आत्महत्येला कारणीभूत ठरतात. जुन्या काळात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा जीवनात सफल होण्यासाठी माणसाला मेहनत करावी लागायची त्याबरोबर काही वेळ सुद्धा खर्ची करावा लागायचा मात्र आजच्या धका-धकीच्या जीवनात माणसाकडे वेळ कमी आणि त्याच्या आकांशा आणि स्वप्न अधिकच मोठे होत चालले आहे. त्यामुळे अपयशाला खचून आत्महत्या सारखे टोकाची पाऊल उचलताना तो दिसत आहे.

आज कुणी कुणाला समजून घेत नाही आज वर्तमान पत्रात रोज आत्महत्येच्या बातम्या वाचणारे दोन मिनिटे वेळ काढून बातमी वाचली की आपल्या पुढच्या कामाला सुरवात करतात. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी कोणीही समाजात धडपड करताना दिसून येत नाही.आज कोणी कोणाला समजून घेत नाही हीच आजची खरी सत्यता आहे. त्यामुळे या घटना कमी होण्याऐवजी अधिकच मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

मात्र आज समाजात असेही काही लोक आहेत जे काही कारण नसताना स्वतःला संपवून घेण्याचा विचार करतात. माझं कोणी एकत नाही, जागून काय करू, असे जगण्यापेक्षा मेलेलं बर असे विचार करणाऱ्या व्यक्तींना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्या व्यक्तीला आत्महत्येपासून आपण परावृत्त करू शकतो. मुळात साकारात्म विचार केल्याने या नकारात्मक विचारांवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: