मुळात व्यवसाय ही स्पर्धा आहे का? वाचा सविस्तर-

मुळात व्यवसाय ही स्पर्धा आहे का? वाचा सविस्तर-

आणि असेल तर कोणाची? कोणासोबत? जर व्यवसाय ही तुमच्यासाठी स्पर्धा असेल तर तुम्ही तुमचा प्रतिस्पर्धी निवडला असेलच आणि जर तो निवडला नसेल तर हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी निवडण्याची गरज आहे; पण या लेखाचा उद्देश थोडा वेगळा आहे. याबद्दल आपण थोडे सविस्तर बोलू या.

काही वेळा एक नवव्यावसायिक हा बाजारातील स्पर्धेबद्दल नेहमीच विचार (थोडे अजून खोलात गेलो तर काळजी) करत असतो, तो एक नवीन व्यवसाय थाटतो, ऑफिस किंवा दुकान सुरू करतो, रोज काम करू लागतो, मेहनत करतो आणि मग एक वाईट सवय सुरू होते, ती म्हणजे इतरांसोबत तुलना करण्याची. मग बराचसा वेळ इतर लोक काय करत आहेत, ते आपल्यापेक्षा किती उणे किंवा अधिक आहेत याविषयी तुलना सुरू करतात. पुढे ह्याचा अट्टहास होतो. हळूहळू आपल्या कामात काही तरी नवीन छान करण्यासाठी वेळ कमी आणि इतरांच्या व्यावसायिक कल्पना, योजना याकडे जास्त लक्ष जाऊ लागते.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.
म्हणजे अगदीच टोकाची भूमिका मी इथे मांडत नसून ती एक वाईट सवय कशी बनते याकडे लक्ष देण्याबद्दल बोलत आहे. म्हणजे जसे प्रतिस्पर्ध्याच्या ऑफर काय आहेत? त्याच्या वेबसाइटवर काय चालू आहे? तो फेसबुकवर काय करतो? अशा गोष्टींकडे विनाकारण अधिक लक्ष दिले जाते आणि याचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे आपल्या व्यवसायात देण्यायोग्य महत्त्वाचा वेळ आपण गमावून बसतो.

तुलना योग्य की अयोग्य?

बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवणे चुकीचे नाही परंतु त्यासाठी किती वेळ द्यायचा आणि आपण नक्की कशावर लक्ष देत आहोत हे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे बघताना एका विशिष्ट भूमिकेतून बघणे महत्त्वाचे आहे. उदा. जर त्याकडे उत्कृष्ट यंत्रसामग्री असेल तर त्याबद्दल तुम्ही अभ्यास करण्याच्या हेतूने बघा आणि त्याजोगी किंवा अजून चांगली यंत्रणा तुमच्याकडे कशी उपलब्ध होईल याची योजना तयार करा.

थोडक्यात सांगायचे तर एक ध्येय ठेवून प्रतिस्पर्ध्याकडे बघायला हवे, आणि जर ते ध्येय नवीन काही शिकण्याचे असेल तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

स्पर्धा कशी हाताळावी?

सर्वात अगोदर आपली बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची वेळ निश्चित करून घ्या, जेणेकरून तुमचा महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता कमी होईल.

पुढील पंचसूत्रीला लक्षात ठेवून मार्गक्रमण करा.

शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे सूत्र आणि ते म्हणजे तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे यावरून तुमचे लढणे ठरते, त्यामुळे प्रतिस्पर्धी निवडताना विशेष काळजी घ्या.
एक नवीन दृष्टिकोन

इथे मी आपणास एका नवीन प्रतिस्पर्ध्याची ओळख करून देत आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वत:. तुम्ही जसे काल होतात त्यापेक्षा आज वेगळे आहात हे समजून घेणे गरजेचे आहे, तुमची स्पर्धा ही तुमच्या स्वत:सोबत आहे, इतर कुणाशीही नाही आणि म्हणूनच तुमच्या व्यवसायाची स्पर्धादेखील तुमच्याच व्यवसायासोबत आहे, इतर व्यवसाय किंवा व्यावसायिकांसोबत नाही.

इतर व्यावसायिकांना प्रतिस्पर्धी समजण्यापेक्षा सहपाठी समजा. शाळेत जशी एकाच परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्व मित्र एकत्र अभ्यास करायचो तसेच एक मोठा उद्योग उभा करण्यासाठी इतर व्यावसायिकांसोबत काम करण्याचे तंत्र शिकून घ्या.

– प्रदीप मोकळ
9595593335
mokal.pradeep@gmail.com
(लेखक हे व्यवसाय मार्गदर्शक आहेत.)

Share this:

ग्लोबल न्युज नेटवर्क: