IPL T20 | पंजाबनं राहुलला तर मुंबईनं हार्दिकला सोडलं

 

आगामी हंगामासाठी आठ संघानी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक नावं दिसली. आठ संघानी २७ खेळाडूंना रिटेन केलेय. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, धोनी, विल्यमसन, रसेल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

तर पंजाब संघाने अर्शदीपसिंह तर हैदराबाद संघानं उमरान मलिक आणि अब्लुद समद यासारख्या अनकॅप खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. रिटेन न करणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी आहे. या यादीमध्ये हार्दिक पांड्या, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, शिखर धवन यासारख्या दिग्गजांची नावे आहेत.. पाहूयात कोणते खेळाडू लिलावात आपलं नशीब अजमावणार आहेत.

पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद आणि लखनौ या दोन संघामुळे आगामी आयपीएल हंगाम रोमांचक होणार आहे. त्यापूर्वी आठ संघाना काही खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार बीसीसीआयने दिले आहेत. त्याशिवाय दोन नव्या संघांना लिलावापूर्वी खेळाडू खरेदी करण्याची मूभाही दिली आहे.

१) मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सुर्यकुमार यादव (८ कोटी), कायरन पोलार्ड (६ कोटी)
२) चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (१२ कोटी), रविंद्र जाडेजा (१६ कोटी), मोईन अली (८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (६ कोटी) रॉयल ३) चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी)
४) दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५० कोटी) नॉर्टीजे (६.५० कोटी)
५) सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी), उमरान मलिक (४ कोटी)
६) कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (१२ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी), व्यंकटेश अय्यर (८ कोटी) सुनील नारायण (६ कोटी)
७) पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (१२ कोटी), अशदीप सिंह (४ कोटी)
८)राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (१४ कोटी), जॉस बटलर (१० कोटी), यशस्वी जयस्वाल (४ कोटी)

Team Global News Marathi: