तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे, ती सांभाळा..
अजित पवार टग्याचा आव आणतोय, पडळकरांची आता पवारांवर टीका
भारतीय जनता पक्षाने अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेचच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यत्री अजित पवारांनी केले होते. आता त्याच्या या वक्तव्याचा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. आमचे सरकार होते तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे.
राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पडळकर यांनी केलाय. त्याचबरोबर तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.