कोरोना काळात मनपाने दिलेल्या कंत्राटाची चौकशी करा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केली मागणी, सेनेच्या अडचणी वाढणार

कोरोना काळात मनपाने दिलेल्या कंत्राटाची चौकशी करा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केली मागणी, सेनेच्या अडचणी वाढणार

ग्लोबल न्यूज: राज्यात शिवसेना बरोबर सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने कोरोना काळात बृहमुंबई महानगर पालिकेने दिलेल्या कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

कोरोना काळात झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करावी, या बैठकीत पालिका आयुक्तांनी उपस्थित राहावे, कोरोनाकाळात केलेल्या कामांची पालिकेच्या लेखापरीक्षक विभागामार्फत चौकशी करावी, आणि यासाठी स्थायी समितीची उपसमिती स्थापन करावी, अशी मागणी शिवसेनेचा आघाडीत मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने केली आहे.

या मागणीला विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही पाठिंबा दिला आहे. संयुक्त पत्रक्कार परिषद घेऊन त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाविषयक कामांचे सर्व प्रस्ताव तपशीलवार माहितीसह सादर करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत. राज्य तिन्ही पक्षही आघाडी साली तरी मनपात आघाडी झालेली नाही असे या दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: