कुख्यात गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीला भाजपा पदाधिकाऱ्याचे वाहन

कुख्यात गुंड गजा मारणे यांची कारागृहातून काढण्यात आलेली मिरवणूक आता चांगलीच गाजत आहे. त्यात त्याच्या मिरवणुकीला आलिशान गाडी पुरवणारा भाजपचा बडा पदधिकारी निघाला आहे. सध्या त्यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गजा मारणेला तुरुंगातून आणण्यासाठी जी लँड क्रुझर कार वापरण्यात आली होती, ती राहुल दळवी यांनी आणली होती. राहुल दळवी हे वडगाव शेरीतील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत.

दळवीने वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नारायण गलांडे यांच्याकडून कामासाठी त्यांची कार घेतली होती. हे प्रकरण तापल्यानंतर राहुल दळवी गायब झाला होता. मात्र, आता पुणे पोलिसांनी राहुल दळवीसह आठ जणांना अटक केली आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर गजा मारणे फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली होती. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.

संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केली आहे. आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: