तोपर्यंत इंदुरीकर महाराजांचं किर्तन होऊ देऊ नका” बीडच्या शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात नाही तर देशभरात युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातच कोरोना लसीकरण मोहीम सुरू असल्याने रुग्ण संख्या कमी झाली आहे. लोकांनी कोरोनाची लस घ्यावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. मात्र काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेणार नसल्याचं विधान केलं होतं.

इंदुरीकर महाराजांच्या या विधानावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपण इंदुरीकर महाराजांना कोरोना लसीचं महत्त्व सांगू, असं आश्वासन दिलं होतं. आता बीडमधील एका शेतकरी पुत्राने चक्क जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत, जोपर्यंत इंदुरीकर महाराज कोरोनाची लस घेणार नाही तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नका, अशी मागणी केली आहे.

३ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले की, “कोरोनाच्या काळात सुशिक्षित लोक आपले प्रियजणांसोबत अत्यंत चुकीचं वागले. आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या लोकांना दूर ठेवलं.” कोरोना झालेल्या लोकांना चांगल्या ताटात जेवण दिलं नाही. त्यांच्या गोधड्या जाळून टाकल्या. त्यांच्या हातांना स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. पण मी अजूनही कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही.”

Team Global News Marathi: