आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात होणार स्वदेशी कोरोना ‘लसी ‘ ची चाचणी

आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात होणार कोरोना स्वदेशी ‘लसी ‘ ची चाचणी

संपूर्ण देशभरावर कोरोनाच्या संसर्गाचे संकट ओढावले आहे. त्यात वाढती रुग्णसंख्या अधिक चिंतेत भर घालणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या परिवाराची कायजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना लस येईपर्यंत सर्वांनी हात धुणे, मास्क वापरणे आणि योग्य अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे. दरम्यान, आता जेजे रूग्णालयातही आता कोरोना लसीची चाचणी होणार आहे अशी माहिती टोपे यांनी दिली.

भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी ‘लस’ची चाचणी जेजे रूग्णालयात होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरुवात होणार आहे. तसेच १ हजार स्वयंसेवकांना ही लस qदिली जाणार आहे. त्याआधी लोकमान्य (सायन) रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन ‘कोरोना लस’ची चाचणी होणार आहे. तर केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड ‘लस’ची चाचणी सुरू आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावर लस निर्मिती केली आहे. याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लस पुढील वर्षी म्हणजेच दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सिरमच्या कोरोना लसकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

वास्तवात ही लस शरीरावर टोचण्याकरिता आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसीत केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या जगभरात करण्यात आल्या आहेत. त्यांणी विज्ञान जगतासमोर आपले निकालही जाहीर केले आहेत. त्या लसीचे उत्पादन भारतात पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येणार आहे. सध्या या लशीचा जगभरात डंका आहे. मात्र, सर्वांचे लक्ष स्वदेशी लसीच्या निकालावर असणार आहे.

 

त्याशिवाय जगभरात अनेक खासगी औषधनिर्मितीतील कंपन्या सध्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याचे काम करत आहे. जगभरातील संशोधक 150 पेक्षा अधिक लसींवर काम करत आहे. एखादी लस विकसित करण्याकरिता फार मोठा काळ कंपन्या घेत असतात. त्यापैकी काही कंपन्यांची माहिती लोकांसमोर मांडण्यात आली आहे.

 

या आजारावर जगभरात प्रथम अमेरिकेतली मॉडर्ना कंपनी, फायझर कंपनी, भारतातील झायडस, ऑस्ट्रेलियातील व्हॅक्सिन, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी, चीनमधील सिनोफार्मा, सिनोवाक बायोटेक, रशिया येथील सेचोनोव्ह, आपल्या आणि अन्य देशातील काही कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्यासुद्धा आता तिसऱ्या ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: