अजित पवारांशी संबंधीत पाच कारखान्यांसह संचालकांच्या घरी आयकरची धाड

अजित पवारांशी संबंधीत पाच कारखान्यांसह संचालकांच्या घरी आयकरची धाड;

अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

मुंबई :  राज्यातून सर्वात मोठी बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण यांचे निकटवर्तीय असलेले साखर कारखान्यांचे संचालक असलेल्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. महत्त्वाच्या ५ कारखान्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून कसून झाडाझडती सुरू आहे.

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांचा समावेश असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित कारखान्यांचे संचालक यांच्या घरावरही धाड टाकली आहे.

आयकर विभागाने कारवाई केलेले सर्व कारखाने हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेला कोणतीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांच्या सहकार्यांने ही कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून धाडीची कारवाई सुरू केली आहे.

सर्व कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे

दौंड शुगर, आंबालिका शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर आणि नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवार यांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, आयकर विभागाने कारखान्यांवर धाड सत्र टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तर येणाऱ्या काळात आयकर विभाग कारवाई करून नेमकी माहिती पुढे आणणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बारामतीमध्येही धाड
बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापे टाकले आहेत. हे छापे नेमके ईडी किंवा आयकर विभागाचे आहेत हे अद्याप समजलेले नाही. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: