मुंबई : १ ऑक्टोबरपासून हवाई मार्ग, मिठाई, गॅस सिलेंडर, आरोग्य विमा सहीत अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. तसेच देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)ने एक ऑक्टोबरपासून आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करत आहेत. जाणून घ्या सविस्तर
गॅस सिलेंडर किंमत
- तेल मार्केटींग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या नव्या किमतींची घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये यामध्ये काही चढ उतार पहायला मिळाले. १ ऑक्टोबरपासून एलपीजी किंमती वाढ किंवा घट होऊ शकते. याच्या मानसिक आणि आर्थिक परिणामासाठी तुम्ही तयार रहायला हवं.
मिठाईचे नियम
- फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा ‘आधीची बेस्ट तारीख’ जाहीर करणे अनिवार्य केले आहे. ऑक्टोबर १ पासून आदेश अमलात आणला जाईल.
ड्रायव्हींग लायसन्स
- केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि ई चलान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही. ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे.
- तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.
गाडी चालवताना..
- गाडी चालवताना रुट नेविगेशनसाठी मोबाईलचा वापर होतो. पण हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की गाडी चालवताना कोणता अडथळा येऊ नये. अन्यथा १ हजार ते ५ हजारपर्यंत दंड होऊ शकतो. रस्ते परिवहन मंडळाने यासंदर्भात माहिती दिली.
आरोग्य विमा
- आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. या पॉलिसींमध्ये १ ऑक्टोबरपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. यामुळे हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे नियम स्टॅंडराइज आणि ग्राहक केंद्रीत होणार आहेत. यात इतर काही बदल देखील आहेत.
परदेशात पैसे पाठवण महाग
- केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावरील टॅक्स संदर्भात नियम जोडलाय. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. तुम्ही विदेशात शिकताय किंवा तुमच्या मुलाला पैसै पाठवताय किंवा विदेशातील तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करताय तर तुम्हाला ५ टक्के अधिक टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCT) भरावा लागणार आहे. रिझर्व बॅंकेच्या लिबरलाइज रेमिटेंस स्किम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींना टीसीएस द्यावे लागणार आहे.
SBI ATM Card आणि Credit Card चे नियम
कोरोना महामारीदरम्यान(corona virus) बँकांनी(bank rule) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(state bank of india)ने आपल्या ग्राहकांना सांगितले की क्रेडिट(credit) आणि डेबिट कार्डवर(debit card) दिल्या जाणाऱ्या काही सेवा ३० सप्टेंबर २०२० नंतर बंद केल्या जातील म्हणजेच एक ऑक्टोबरपासून या सेवा उपलब्ध नसतील. भारतीय रिझर्व्ह बँक(indian reserve bank) एक ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम बदलत आहे.
या सेवा आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनशी संबंधित आहेत. एसबीआयने म्हटले की जर तुम्ही आपल्या कार्डवरून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खरेदीची सुविधा चालू ठेवू इच्छितात तर INTL नंतर आपल्या कार्डचा नंबरच्या अखेरच्या 4 डिजिट लिहून 5676791 वर SMS करा. कोरोनामुळे कार्डधारकांना आरबीआयने हा नियम लागू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डवरून ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळी प्रायोरिटी सांगावी लागेल.