‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार, पुढचे पाच दिवस महत्वाचे

 

मुंबई | मार्च महिना उजाडला असला तरी काही राज्यांवर अजूनही पावसाचं संकट कायम आहे. पुढचे पाच दिवस भारतीय समुद्रात वेगवान वारे वाहणार आहेत. त्यामुळे काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात हवामान विभागाने व्यक्त केली असून सतर्कतेचा शरद देण्यात आला आहे.

पश्चिमी वाऱ्यामुळे विविध ठिकाणी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि गल्फ ऑफ मन्नारच्या परिसरात वेगवान वारे वाहत आहेत. तामिळनाडू, पुड्डुचेरी, कराईकल परिसरात 4 व 5 मार्च रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

रायलसीमा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. देशातील अनेक भागात पावसाची शक्यता असताना महाराष्ट्रात मात्र पुढचे पाच दिवस पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही. तसेच पुढचे पाचही दिवस महाराष्ट्रात कोरडं हवामान असणार आहे. तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता असली तरी पावसाचा इशारा मात्र देण्यात आलेला नाही.

 

Team Global News Marathi: