राज्यात रविवारी इतक्या हजारांच्या पटीने वाढली रुग्णसंख्या

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. त्यामुळे वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळेच नागरिकांनी राज्य सरकारचे घालून दिलेले नियम गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात रविवारी १६ हजार ६२० कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आढळतानाव दिसत आहे. त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणास नागपूर, वर्ध्यात जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहे.

राज्यात करोना प्रसाराचा वेग वाढला असून रुग्णाचे प्रमाण सरासरी १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून ९० हजारांच्यावर पोहोचली आहे. सर्वाधिक वाढ अकोल्यात झाली असून त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Team Global News Marathi: